मुंबई - जुनी पेंशन योजना रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी आज (१३ मार्च) राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) यांच्या नेतृत्वाखाली ओल्ड कस्टम हाऊस येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर एक तासाचे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पुढील चार दिवस संघटनेचे सदस्य काळया फिती लावून काम केले जाणार आहे. हे आंदोलन ३६ जिल्ह्यात ३५८ तालुक्यात करण्यात आल्याची असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे.
काय आहेत मागण्या -
१ - महाराष्ट्र राज्याच्या सेवेतील 2005 नंतरच्या व केंद्र शासनाच्या सेवेतील 1 जानेवारी 2004 नंतरच्या सरकारी निमसरकारी व खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
२ - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे संपूर्ण खाजगीकरण व उदारीकरण स्वरूपाचे केले असून यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ठेवली आहे. सदर शैक्षणिक धोरण महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात येऊ नये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राष्ट्रीय स्तरावर रद्द करण्यात यावे.
३ - पूर्वीचे कामगार कायदे हे कामगार-कर्मचारी यांच्या हिताचे असतांना केंद्र सरकारने ते रद्द करून चार कामगार संहिता लागू केल्या आहेत त्यामुळे कर्मचारी कामगारांचे खूप मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात चार कामगार संहिता लागू करण्यात येऊ नये व राष्ट्रीय स्तरावर या चार कामगार संहिता रद्द करावेत.
No comments:
Post a Comment