मुंबई - अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि दिव्यांगजन सहित समाजातील सर्व दुर्बल घटकांना आर्थिक आणि सामाजिक न्याय देणारा यंदाचा अर्थसंकल्प असल्याचे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 चे स्वागत केले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सामाजिक न्याय मंत्रालयास बजेट वाढवून देत 1 लाख 59 हजार कोटी भरघोस निधी उपलब्ध करण्यात आला आहे याबद्दल केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांचे आठवले यांनी अभिनंदन केले आहे. (A budget that provides social justice to the weaker sections)
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प हा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक सर्व क्षेत्रांसाठी अमृततुल्य ठरणारा अर्थसंकल्प आहे. अशा शब्दांत रामदास आठवले यांनी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी लाभलेल्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या आर्थसंकल्पातून देशाच्या आर्थिक व्यवसायीक औद्योगिक सर्व क्षेत्रांना नवसंजीवनी दिली आहे असे आठवले यांनी म्हटले आहे.
सर्व वर्गांना सामाजिक आर्थिक न्याय देणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे. लोककल्याणाच्या विविध योजनांना प्राधान्य देत भरीव निधीची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात आहे. स्वच्छ भारत मिशन च्या अंतर्गत 11.7 कोटी घरांना शौचालय बांधून दिले आहे. देशात 102 कोटी पेक्षा अधिक लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. कोविड प्रतिबंधा साठी प्राधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने चांगले काम केले आहे. सामान्य जनांसाठी 47.8 कोटी जन धन बॅंक खाते खोलण्यात आले आहेत. समाजातील शेवटच्या माणसा पर्यंत विकास आर्थिक लाभ पोहोचला पाहिजे हे उद्दिष्ट्य ठेऊन यंदाचा अर्थसंकल्प एक परिपूर्ण अर्थसंकल्प असून याबद्दल प्राधानमंत्री नरेंद्र मोदी; अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या सर्व टीमचे आठवले यांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment