IIT दर्शन सोळंकी आत्महत्येच्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 February 2023

IIT दर्शन सोळंकी आत्महत्येच्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासा


मुंबई - पवई आय आय टी मधील दलित विद्यार्थी दर्शन सोळंकी या दलित विद्यार्थ्याने जिथे 7 व्या माळ्यावरून ऊडी मारून आत्महत्या केली त्या घटनास्थळाचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा अहवाल जाहीर करावा. जर सीसीटीव्ही फुटेज नसेल तर निष्काळजीपणाबद्दल आय आय टी प्रशासनाला जबाबदार धरावे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले.

दलित विद्यार्थी दर्शन सोळंकी यांच्या आत्महत्येमुळे दलित आदिवासी समाजात दूरगामी परिणाम झाले असून आपल्या हुशार विदयार्थ्यांना आय आय टी सारख्या उच्चशिक्षण संकुलात पाठवायचे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी खंत गौतम सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केली.

आय आय टी प्रशासनाविरुद्ध रिपब्लिकन पक्षातर्फे आय आय टी मेन गेट समोर पवई येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे संयोजन रिपाइंचे पवई विभागीय नेते बाळ गरूड, विनोद लिपचा, भाऊ पंडागळे यांनी केले तर नेतृत्व रिपाइंचे गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव, साधू कटके आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad