मुंबई - पवई येथील (IIT Mumbai) आयआयटीमध्ये दर्शन सौलंकी (Darshan Solanki) या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणी संचालकांची हकालपट्टी करण्यात यावी व या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी तसेच अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भीम आर्मीने (Bheem Army) आज आयआयटीवर धडक देवून जोरदार निदर्शने केली. या संस्थेतील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून सबंधितांवर कारवाई करावी यासाठी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला.
आयआयटी पवई येथे बी टेक प्रथम वर्षात शिकणा-या दर्शन सोलंकी याने नुकतीच आत्महत्या केली आहे. मात्र ही आत्महत्या की आणखी काय वेगळे कारण आहे याची चौकशी होणे आवश्यक आहे. यापूर्वी रोहित वेमुला पायली तडवी अशी गंभीर प्रकरणे घडली असून सोलंकीची आत्महत्या म्हणजे सरकारी संस्था म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे बळी घेणारे कारखाने आहेत काय असा सवाल भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांनी यावेळी केला. भीम आर्मीच्या शिष्टमंडळाने यावेळी संचालक चौधरी यांची भेट घेऊन यासंदर्भात जाब विचारला.
सदर आंदोलनात भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र अध्यक्ष सीताराम गंगावणे, मुंबई अध्यक्ष सुनील थोरात, अविनाश गरूड दिनेश शर्मा, अविनाश समिंदर, विजय कांबळे, सागर कांबळे, सुशीला कापुरे, शशांक कांबळे, सिद्धार्थ इंगळे, रुपाली जमदाडे, विजय कांबळे, अॅलेक्स मोरे, सुशीलकुमार वर्मा आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment