मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरूवारी (१९ जानेवारी) मुंबई दौऱ्या दरम्यान अतिरेकी, असामाजिक तत्व ड्रोन, पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टचा वापर करून हल्ला करू शकतात असा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), अंधेरी आणि जोगेश्वरी भागात ड्रोन, पॅराग्लायडर आणि रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टच्या उड्डाणावर बंदी घालण्याचा आदेश मुंबई पोलिसांनी जारी केला आहे. गुरुवारी दिवसभर हे आदेश लागू असतील. या आदेशाचे पालन न करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या कालावधीत मुंबईतील मेट्रो २ अ, ७, मुंबई पालिकेचे विविध प्रकल्प, सिएसएमटी स्थानकाचे सुशोभीकरण आदी कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती असणार आहे. बीकेसी एमएमआरडीए ग्राउंड येथे मुंबई भेट, मेट्रो लाईन 2 ए आणि 7, गुंदवली स्टेशन ते मोगरापाडा मेट्रो स्टेशन गुंदवली स्टेशन ते मोगरापाडा मेट्रो स्टेशनवर अतिरेकी असामाजिक तत्व अतिरेकी, असामाजिक तत्व ड्रोन, पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टचा वापर करून हल्ला करू शकतात असा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.
त्यामुळे बीकेसी पोलीस स्टेशन, अंधेरी पोलीस स्टेशन, मेघवाडी पोलीस स्टेशन आणि जोगेश्वरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ड्रोन, पॅरा-ग्लायडर्स, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट फ्लाइंग अॅक्टिव्हिटीस परवानगी दिली जाणार नाही. "हा आदेश 19 जानेवारीच्या 00.01 तासांपासून 19 जानेवारीच्या 24.00 तासांपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 188 अंतर्गत शिक्षेस पात्र असेल". फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चा कायदा II) च्या कलम 144 अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांद्वारे हा आदेश जारी केला.
No comments:
Post a Comment