बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील पाणीपुरवठ्यासाठी गुंदवलीपासून भांडुप संकुल जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत तलावातील पाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत जल बोगद्याचे जाळे तयार केले आले आहे. तसेच, भांडुप संकुल येथून शहर व उपनगरातील विविध सेवा जलाशयापर्यंत व सेवा जलाशयापासून ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यासाठी भूमिगत जलबोगद्याचे जाळे उभारले आहे. मागील काही वर्षात विंधन विहिरी कूपनलिका खोदताना भूमिगत जलबोगद्यास हानी पोहचून दुर्घटना घडलेल्या आहेत. अशा घटनांमुळे पाणीपुरवठा बऱ्याच कालावधीकरीता विस्कळीत होतो. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पालिकेने
मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सर्व रहिवाशी, बांधकाम व्यावसायिक, विकासक, सार्वजनिक संस्था, विंधन विहिरी खणणारे कंत्राटदार, विंधन विहिरी खणण्यासाठी यंत्र सामुग्री उपलब्ध करुन देणारे कंत्राटदार आणि इतर सर्व नागरिकांनी परवानगी घेऊनच खोदकाम करावे असे आवाहन केले आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.
No comments:
Post a Comment