मुंबई - जगविख्यात बौद्ध धर्मगुरू 'महाथेरो अजाह्य जयासारो 'थायलंड येथून भारत भेटीसाठी आले आहेत. यावेळी त्यांनी विविध भिक्खू संघटनांना भेट दिली. त्यांच्या या भेटीदारम्यान मुंबईमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दादर येथील शिवाजी मंदिर येथे भिक्खू संघासाठी चिवरदान करण्याचा कार्यक्रम देखील पार पडला . याप्रसंगी जागतीक कीर्तीचे आदरणीय 'महाथेरो अजाह्य जयासारो' यांच्या धम्मावर आधारित मराठी अनुवादीत पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या चिवरदान सोहळ्यात उपासक मोठ्या संख्येने स्वहस्ते चिवरदान करून सहभागी झाले. चीवरदान सोहळ्यासाठी उपसकांची नोंदणी आठवडाभर आधीच करण्यात आली होती. चिवरदान कार्यक्रमाला मुंबई आणि आसपासच्या भागातील उपासकांनी उत्तम प्रतिसाद दिला. ज्यांची चिवरदान करण्याची ईच्छा आहे परंतु आर्थिक अडचणीमुळे ज्या उपासकांना चिवर आणणे शक्य नव्हते अश्या उपासकांना मेत्ता 'ग्लोबल फाऊंडेशनतर्फे' मोफत चिवर उपलब्ध करून देण्यात आले. अजाह्य जयासारो हे त्त्यांच्या धम्म शिकवणी आणि ध्यान धारणेसाठी जगभरात ओळखले जातात. ते उपासक आणि भिक्खू या दोघांनाही कायम प्रेरणा देत असतात.
या कार्यक्रमाचे आयोजन ‘मेत्ता ग्लोबल फाऊंडेशन’ या मुंबईस्थित ना नफा या तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेने केले होते. फाउंडेशनचे उपक्रम आणि कार्य हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावर आणि विचारांवर आधारित आहे. ही संस्था तरुणांना सशक्त बनवण्यासाठी आणि बुद्धाच्या उदात्त शिकवणींपर्यंत पोहचण्यासाठी आणि पोहचण्याची सुविधा देण्यासाठी समर्पित आहे.
या कार्यक्रमाला उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेत्ता ग्लोबल फाऊंडेशनने उपस्थित सर्वांच्या वतीने आदरणीय अजह्य जयसारो यांचे या प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment