वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू या संस्थेनुसार भारताची लोकसंख्या ही तब्बल 1.417 बिलियन म्हणजे 140 कोटी पेक्षा जास्त झाली आहे. भारताची लोकसंख्या ही चीनपेक्षा 50 लाखांनी जास्त आहे. मंगळवारी चीनची लोकसंख्या ही 1.412 बिलियन एवढी होती. चीनची लोकसंख्या 1961 नंतर पहिल्यांदाच कमी झाली आहे. भारताची लोकसंख्या ही 30 वर्ष वयोगटापेक्षा कमी आहे. या अहवालानुसार पुढील काही वर्षात भारत जगातील वेगवान विकास करणारा देश होणार आहे. तसेच भारताची अर्थव्यवस्था देखील सर्वात मोठी होणार आहे.
यापूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाने भारताबाबत वेगळा अनुमान लावला होता. या वर्षाच्या शेवटी भारत चीनला लोकसंख्येबाबत मागे टाकेल असा अंदाज होता. मात्र, या वर्षांच्या सुरुवातीलाच भारताने लोकसंख्येच्या बाबतील मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्र महासंघाने दिलेल्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या ही तब्बल 1.668 अब्ज होण्याची शक्यता आहे. डब्ल्यूपीआरने दिलेल्या अहवालानुसार 18 जानेवारी 2023 पर्यंत भारताची लोकसंख्या 1.423 अब्ज झाली आहे.
डब्ल्यूपीआर सोबथ रिसर्च प्लॅटफॉर्म मेक्रोट्रेंडसनुसार भारताची लोकसंख्या ही आता 1.428 एवढी आहे. कोरोनामुळे भारताने लोकसंख्या मोजणी ही थांबवली होती. वाढत्या लोकसंख्येसोबतच भारत हा सर्वाधिक तरुण असलेला देश होणार आहे. देशातील तरुणांना रोजगार देण्याचे मोठे आव्हान हे मोदी सरकार पुढे राहणार आहे. दरवर्षी लाखो रोजगार निर्मिती सरकारला करावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment