दक्षिण मुंबईहून नवी मुंबई विमानतळ जेएनपीटी गाठणे होणार सोपे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 January 2023

दक्षिण मुंबईहून नवी मुंबई विमानतळ जेएनपीटी गाठणे होणार सोपे


मुंबई - मुंबई (Mumbai) मधील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी अनेक रस्ते आणि पूल बांधण्याचे काम तेजीत सुरू आहे. यातच आता बीएमसीने (Bmc) ईस्टर्न फ्रीवेच्या उत्तरेकडील ऑरेंज गेट ते पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्याची योजना आखली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईहून नवी मुंबई विमानतळ (New Mumbai Air Port) आणि जेएनपीटी (JNPT) गाठणे सोपे होईल. (Navi Mumbai Airport JNPT will be easy to reach from South Mumbai)

मुंबईतील रस्त्यांच्या परिस्थितीवर भाष्य करताना बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या मुंबईच्या पूर्व उपनगरांना चेंबूर, घाटकोपरला जोडण्यासाठी फ्रीवेचा वापर केला जातो. हा फ्रीवे दक्षिण मुंबईतील ऑरेंज गेटपर्यंत जातो. ग्रँट रोड ते इस्टर्न फ्रीवे (ऑरेंज गेट) पर्यंतचे अंतर 5.56 किमी आहे. मात्र हे अंतर पार करण्यासाठी सध्या 30 ते 50 मिनिटे लागतात. एलिव्हेटेड रस्त्याच्या बांधकामामुळे हे अंतर केवळ 6 ते 7 मिनिटांत पार करता येणार आहे. ग्रँट रोड, नाना चौक, नॅपन्सी रोड, तारदेव, मुंबई सेंट्रल परिसरही थेट एमएमआरशी जोडले जाईलच पण सोबतच शिवडी-वरळी लिंक रोड आणि ऑरेंज गेट ते कोस्टल रोड मुळे मुंबईतील दक्षिण भागाला तीन वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी मिळणार आहेत.

दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान लागणाऱ्या प्रवासाच्या वेळेत मोठी कपात होणार आहे. सुमारे 5.5 किलोमीटरच्या या प्रस्तावित एलिव्हेटेड रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 2500 कोटी रुपये खर्च येणार आहे. यामुळे ठाणे आणि नवी मुंबईहून येणाऱ्या गाड्यांना जलद रित्या पोहचण्यास मदत होते. तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक शिवडी येथे फ्रीवेला जोडला जाणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईहून नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी गाठणे सोपे होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad