आपत्कालीन परिस्थितीत वाचण्यासाठी मुंबईकरांना मिळणार संरक्षणाचे धडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2023

आपत्कालीन परिस्थितीत वाचण्यासाठी मुंबईकरांना मिळणार संरक्षणाचे धडे


मुंबई - पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होणे, आगीचा भडका उडणे अशा आपत्कालीन परिस्थितीत स्वतःसह अडकलेल्यांचा जीव कसा वाचवावा याचे धडे मुंबईकरांना मिळणार आहे. १८ ते ४० वयोगटातील नागरिकांसाठी ‘आपदा मित्र’ हा १२ दिवसांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण मोफत दिले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्‍हा या २ जिल्ह्यांच्या आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणांमार्फत बृहन्‍मुंबईतील नागरिकांना सहभागी होता येईल, असा ‘आपदा मित्र’ हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला जात आहे. १२ दिवसांचा हा प्रशिक्षण कार्यक्रम (रविवार वगळून) आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन विभागाच्‍या परळ येथील आपत्ती व्‍यवस्‍थापन प्रशिक्षण केंद्रात सुरु करण्‍यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशिक्षण प्राप्‍त असलेल्या प्रशिक्षित नागरिकांची गरजूंना मदत व्हावी आणि संभाव्य जीवित व वित्तहानी कमीतकमी व्हावी, या उद्देशाने हे प्रशिक्षण सुरु करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई शहर व मुंबई उपनगरातील प्रत्‍येकी ५०० याप्रमाणे एकूण एक हजार नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या प्रमुख रश्मी लोखंडे यांनी दिली.

फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक -
प्रशिक्षण कार्यक्रमात किमान ७ वी उत्तीर्ण असलेले मुंबईचे रहिवासी अर्ज करु शकतात. संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेले, वैद्यकीय व्यवसायिक आणि स्थापत्य अभियंता यांच्यासाठी वयाचे निकष शिथिल करण्यात येतील. या प्रशिक्षणासाठी अर्ज करणा-या व्यक्तिंचे शारिरीक, मानसिक व वैद्यकीय आरोग्य चांगले असणे आवश्यक असून फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच आपत्ती प्रतिसाद कार्यात स्वंयसेवा करण्याचा पूर्वानुभव असलेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून आपत्ती व्‍यवस्‍थापनाचे धडे प्रात्यक्षिकांसह देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad