दोन दिवसानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2023

दोन दिवसानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे


मुंबई - राज्यातील ७ हजार निवासी डॉक्टरांनी काल २ जानेवारीपासून आपल्या मांगण्याबाबत संप पुकारला होता. आज वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेसोबत बैठक झाली.  या बैठकीत  आमच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला आहे. त्यामुळे संप मागे घेतला असल्याचे  मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी सांगितले.

वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १४३२ जागांची पदनिर्मिती, वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील वसतिगृहांची दुरवस्था, सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यपकांची अपुरे पदे तातडीने भरावीत, महापालिका आणि सर्व शासकीय रुग्णालयात महागाई भत्ता आणि थकबाकी तत्काळ द्यावी. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी मार्डने काल सोमवार २ जानेवारीपासून संप पुकारला होता. या संपात महापालिकेच्या २ हजार निवासी डॉक्टरांसह राज्यातील एकूण ७ हजार निवासी संपात सहभागी झाले होते. निवासी डॉक्टरांनी दोन दिवस संप केल्याने ओपीडी सेवा तसेच वॉर्डमधील सेवेवर परिणाम झाला होता. उद्या बुधवारपासून अत्यावश्यक विभागात सेवेत असणाऱ्या निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मार्डच्या डॉक्टरांची आज गिरीश महाजन यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहासाठी केंद्र सरकारकडून ५०० कोटींच्या निधी मागितला आहे. त्याशिवाय, सीएसआर अंतर्गत निधीची मागणी कॉर्पोरेट क्षेत्राकडे करण्यात आली आहे. त्यांनीदेखील सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. दोन दिवसांत १४३२ पदे भरली जाणार आहे. या भरतीचा प्रस्ताव याआधीच होता. त्याला अधिक गती येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले. महापालिका अखत्यारीत असलेल्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्याकडे याची चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad