शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन रस्त्याच्या कामाच्या कंत्राटावरून गंभीर आरोप केले आहेत. सरकारने मुंबई महापालिकेची लूट सुरू केली आहे. पाच हजार रस्त्यांचे कोटींचे टेंडरही धुळफेक आहे. ४५० किमी ६०८४ कोटींचे टेंडर काढण्यात आले. हे काम फेब्रुवारीत सुरु केले तर पूर्ण कधी होणार? मुंबईत कामे करण्याचा कालावधी हा १ ऑक्टोबर ते ३१ मे असा असतो. कारण बाकीच्या कालावधीत पाऊस पडतो. पावसाळ्यानंतर सुरू झालेली कामे पावसाळ्याच्या आधी पूर्ण केली जातात. मात्र आता हाती घेतलेली कामे पावसाळ्याच्या आधी पूर्ण होतील का? याचा अभ्यास केला गेलेला नाही. ही कामे पूर्ण झाली नाही, तर खोदून ठेवलेले रस्त्यांची कामे तशीच पडून राहणार आहेत. तसेच या सगळ्या गोष्टी घडत असताना ४८ टक्के फायदा कंत्राटदारांना करून देण्यात आला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
याबाबत पालिकेने खुलासा करताना म्हटले आहे की, छोट्य़ा कंत्राटदारांकडून रस्त्याची गुणवत्ता योग्य पद्धतीने मिळत नसल्यानेच मोठ्या कंपन्यांनी सहभागी व्हावे अशा पद्धतीने पालिकेने निविदा प्रक्रिया राबवलवी होती. याआधीच्या २०१८ च्या दरानुसार कंपन्यांनी सीसी रोडच्या निविदा प्रक्रियेसाठी तितकासा सहभाग दाखवला नव्हता. परंतु नव्या दरांनुसार काही कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे नव्या २०२३ च्या दरांनुसार वाढीव १७ टक्क्यांची तफावत दिसते असल्याचे पालिकेने म्हटले आहे. परंतु निविदा प्रक्रियेत रस्त्यांच्या गुणवत्तेच्या अनुषंगाने कोणत्याही निविदेच्या अटी आणि शर्थींमध्ये कोणतीही तडजोड केली नसल्याचे स्पष्टीकरण पालिकेने केल आहे.
No comments:
Post a Comment