मुंबईत या ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 January 2023

मुंबईत या ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी


मुंबई - बृहन्मुंबई क्षेत्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या परवान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना फटाके विक्रीसह फटाके जवळ बाळगणे, हस्तांतरण करणे, प्रदर्शन करणे आणि वाहतूक करण्यास तसेच, ५०० मीटर बॉटलिंग प्लांटच्या बफर झोनमध्ये फटाके फोडण्यास ३१ जानेवारीपर्यंत बंदी असल्याचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती पोलीस दलातील अभियान शाखेचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली आहे. (Bursting of firecrackers is prohibited in buffer zones )

नववर्षानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत असल्याने अन्य नागरिकांना होणारा अडथळा, गैरसोय, धोका किंवा अन्य प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी फटाक्यांवर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत.

५०० मीटर बॉटलिंग प्लांटच्या बफर झोनसोबतच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.च्या परिमितीतील व बाहेरील क्षेत्र, बॉटलिंग प्लांट बफर झोन, माहूल टर्मिनल क्षेत्र, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्र, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्र, स्पेशल ऑइल रिफायनरीच्या १५ आणि ५० एकर क्षेत्र अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके, रॉकेट्स न उडवण्याचे किंवा न फेकण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad