मुंबई पालिकेत ८४९ सुरक्षा रक्षकांची लवकरच भरती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2023

मुंबई पालिकेत ८४९ सुरक्षा रक्षकांची लवकरच भरती


मुंबई - महापालिकेतील सुरक्षा रक्षकांची सुमारे एक हजार ७३५ पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त जागांपैकी किमान अर्ध्या रिक्त जागा भरण्यात याव्यात यासाठी सुमारे ८४९ सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचे आदेश २०१८ रोजी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. मात्र चार वर्ष उलटूनही भरती झालेली नाही. त्यामुळे कमी मनुष्यबळाचा परिणाम सुरक्षा व्यवस्थेवर होत असल्याने तात्काळ भरती करण्यात यावी अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे.

मुंबई महापालिकेच्या सुरक्षा विभागातील सुरक्षा कर्मचा-यांना पालिकेच्या वॉर्ड इमारती, रुग्णालये, मालमत्ता, धरणे, जलाशय, जलवाहिन्या आदी ठिकाणी सुक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या मुख्यालय इमारतीची सुरक्षाही सुरक्षा विभागाकडून केली जाते. सध्या मुख्यालय इमारतीची सुरक्षा करण्यासाठी ६९ सुरक्षा रक्षक कर्मचारी हे तीन शिफ्ट मध्ये कार्यरत आहेत. मात्र येथे २४ जागा रिक्त आहेत. मुख्यालयात एका शिफ्टमध्ये केवळ २३ सुरक्षा रक्षक कर्मचारी तैनात असतात. त्यातही सुट्टी वा कोणी रजेवर गेल्यास एका शिफ्टमधील २३ ची संख्या आणखी कमी होत असल्याचे सांगण्यात येते. सध्या सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असणाऱ्यांची एकूण संख्या २ हजार १९४ असली तरी अजूनही १ हजार ७१५ पदे सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त आहेत. मुख्य रक्षक पदी २०५ जण कार्यरत असून १० पदे रिक्त आहेत. तर जमादारपदी ३७ जण कार्यरत असून १० पदे रिक्त आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत सुरक्षा रक्षक विभागात एकूण २ हजार ३४७ पदे कार्यरत असून १ हजार ७३५ पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे भरणे आवश्यक असल्याचे सुरक्षा रक्षकांनी म्हटले आहे. दरम्यान, ही पदे तात्काळ भरण्यात यावीत अशी मागणी म्युनिसिपल युनियनने कामगार आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आदेश दिले होते. त्यानुसार ८४९ सुरक्षा रक्षक पदे भरण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरु आहे. येत्या सहा महिन्य़ांत ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, अशी माहिती सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिका-याने दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad