या योजनेतून ५ लाखांपर्यंतचे उपचार मिळणार मोफत ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 December 2022

या योजनेतून ५ लाखांपर्यंतचे उपचार मिळणार मोफत !


मुंबई / नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून देशातील गरीब नागरिकांना मोफत उपचार मिळावे यासाठी आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना (PMJAY) चालवली जाते. या योजनेचा लाभ आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी घेतला आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. 

२०१८ मध्ये केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेचा आतापर्यंत ४.५ कोटी नागरिकांनी लाभ घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी संसदेत या योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती दिली. बहुतांश लोकांना आजही या योजनबाबत माहिती नसल्याने ते याच्या लाभापासून वंचित आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कार्ड बनवावे लागेल. १८ वर्षांवरील लोक आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या mera.pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पात्रता चेक करावी लागेल.

आयुष्यमान भारत कार्ड कसे मिळवाल?
- आयुष्यमान भारत हे कार्ड मिळवण्यासाठी PMJAYच्या अधिकृत वेबसाईटवर जा. यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाका. OTP टाकून लॉगइन करा.
- लॉगइन केल्यावर तुमचे राज्य निवडा यानंतर नाव, नंबर, रेशनकार्ड क्रमांक किंवा RSBY URN नंबर टाकून योग्यता तपासा, स्क्रिनवर तुमचे नाव दिसल्यास तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहात.
- ऑनलाईन कर्ज मिळवण्यासाठी पात्रता तपासल्यावर setu.pmjay.gov.in वर जा आणि नोंदणी करा. यानंतर तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- केवायसी केल्यानंतर कागदपत्रे आणि तपशीलांची पडताळणी केली जाईल. यानंतर तुमचे कर्ज जारी करण्यात येईल. तुम्ही आयुष्यमान भारतच्या पोर्टलवरून सुद्धा कार्ड डाऊनलोड करू शकता.
- कार्ड आल्यावर तुम्ही संबंधित रुग्णालयांमध्ये ५ लाखांपर्यंतचे सर्व उपचार मोफत घेऊ शकता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad