चंद्रकांत पाटलांवर शाई फेक करणारे मनोज गरबडे याचे राजगृहावर अभिनंदन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 December 2022

चंद्रकांत पाटलांवर शाई फेक करणारे मनोज गरबडे याचे राजगृहावर अभिनंदन


मुंबई - राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांनी शाळा सुरू करण्यासाठी भिक मागितली होती असे वक्तव्य केले होते. याचा सर्वत्र निषेध करण्यात आला. पुणे दौऱ्यावर असताना पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्यांच्या सहका-यांनी शाई फेकली होती. या प्रकरणी गरबडे व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाल्यावर त्यांनी चैत्यभूमी आणि रजगृहावर जाऊन आंबेडकर कुटुंबीयांची भेट घेतली आहे. 

भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांचा अवमान केल्याबद्दल पुणे समता सैनिक दलाचे मनोज गरबडे यांनी शाई फेक केली होती, त्यांना जामीन मिळाल्यानंतर दादर चैत्यभूमी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सौनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव आंबेडकर यांची रात्री राजगृह येथे भेट घेतली. आंबेडकर यांनी यावेळी मनोज गरबडे आणि त्यांचे सहका-यांचे अभिनंदन केले. सदर प्रसंगी समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे, महाराष्ट्राचे सरचिटणीस सुशील वाघमारे उपस्थित होते. चैत्यभूमीवर त्याना समता सैनिक दलाची टोपी समता सैनिक दलाचे मेजर जनरल व चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदिप कांबळे यांनी परिधान केली. मनोज गरबडे यांनी समता सैनिक दलाचे काम भीमराव आंबेडकर यांच्याच नेतृत्वाखाली करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि शाई फेक करणाऱ्या मनोज आणि इतरांवर लावलेले 307, 120 कलमे रद्द करण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाने केली होती. 
    
डॉ. भीमराव य आंबेडकर यांनी, भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे रक्षण व धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी देशभर लाखों समता सैनिक दलाची फौज उभारणार असून त्यासाठी एक दिवसांची शिबिरे धम्मचक्र प्रवर्तन दिन - 5 ऑक्टोबर पासून सुरू केली असल्याचे सांगून समता सैनिक दलामध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन केल्याचे एस के भंडारे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad