मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 December 2022

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक



पुणे - महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पदाधिका-यांच्या घरी असताना त्यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आली. एका कार्यकर्त्याच्या घरून निघत असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर अचानक एका व्यक्तीने शाई फेकली. यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.

यावेळी शाई फेकणारा कार्यकर्ता चंद्रकांत पाटील मुर्दाबाद अशी घोषणाबाजी यावेळी शाई फेकणारा व्यक्ती करत होता. त्या व्यक्तीचे नाव अद्याप समजलेले नाही. श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी सोहळ््याच्या उद्घाटन समाधीसाठी चिंचवड गावात आले होते, त्यावेळी त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले.

चंद्रकात पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे विद्यार्थी आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील मुर्दाबाद अशा घोषणा करत भर रस्त्यात त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीबा फुले यांचे फोटो हातात घेतले होते. ते फोटो दाखवत त्यांना काळे झेंडे देखील दाखवले. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. वेगवेगळ्या शहरात कॉंग्रेसकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad