नवी दिल्ली - कोरोना अद्याप संपलेला नाही, असे विधान केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आहे. त्यामुळे देशात पुन्हा कोरोनाचे संकट घोंघावत असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्याचबरोबर यासंदर्भात सर्व यंत्रणांना अॅलर्ट राहण्याचे आदेशही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. लक्षणं असतील तर कोरोना टेस्ट करा. ज्यांनी प्रतिबंधात्मक डोस घेतला नसेल तर त्यांनी डोस घ्यावा, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असे आवाहनही आरोग्य मंत्र्यांकडून करण्यात आले आहे.
काही देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणं पाहता आज आम्ही भारतातील कोरोनाच्या स्थितीचा तज्ज्ञांच्या आणि अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेतला. कोविड अद्याप संपलेला नाही. यावेळी सर्व संबंधितांना अॅलर्ट आणि जागरुकता वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे ते म्हणाले.
दरम्यान, बैठकीबाबत नीती आयोगाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, कोरोनाच्या जागतीक परिस्थितीवर आज केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थित चर्चा झाली. कोरोनाच्या बाबतीत आपण सतर्क आहोत. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. या बैठकीत चीनच्या नवीन व्हेरिअटची चर्चा झाली. भारतातील सर्व रुग्णालातील न्युमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी केली जाईल. यासंदर्भात प्रत्येक आठवड्यात बैठक होईल.
चीनसह इतर काही देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली. यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. आता चीनमधील ‘बीएफ ७’ (BF 7) हा व्हेरिएंट भारतात आला असून गुजरातमध्ये याचे २ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीयांची चिंता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या वडोदरामध्ये पहिल्या ‘बीएफ ७’ या व्हेरिएंटच्या रुग्णाची नोंद झाली. संबंधित महिला रुग्ण ही एनआरआय असल्याची माहिती देण्यात आली.
तसेच, गुजरातमध्ये आणखी २ रुग्ण आढळून आले असून त्यांनाही ‘बीएफ ७’ची लागण झाली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप याबाबत अधिकृतरीत्या कोणतेही माहिती देण्यात आली असून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. देशात यापूर्वीसुद्धा ‘बीएफ ७’चे रुग्ण आढळून आले होते. पण, चीनमधील सध्याची परिस्थिती पाहता, भारतातही चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. “आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत.” असा विश्वास त्यांनी दर्शविला आहे. सध्या भारतामध्ये कोरोना नियंत्रणात आहे, मात्र भविष्यात रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी तयारी सुरू केलेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दर आठवड्याला कोरोना संदर्भात आढावा बैठक घेणार असल्याचेही सांगितले. तसेच, त्यांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.
चीनसह इतर काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. अचानक वाढत असलेल्या या संसर्गामुळे भारताने अधिकची खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारनेही पाऊले उचलली आहेत. महाराष्ट्र सरकारने कोरोना नमुन्यांच्या जीनोम सीक्वेन्सिंग करणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात केंद्राने राज्यांना काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या.
No comments:
Post a Comment