मुंबई - राज्यभरात कोरोनानंतर आता गोवरने थैमान घातले आहे. गोवरची लागण झालेल्यांची संख्या ६५८ वर पोहोचली आहे. दरम्यान, आता गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरण व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत.
राज्यात गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. रविवारी संशयित गोवर रुग्णांची संख्या १० हजार ५४४ वर पोहोचली आहे. तब्बल तीन वर्षांपासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे संपूर्ण देशभरात पहिल्यांदा लॉकडाऊन लागले होते. आता पुन्हा क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार आहे.
सध्या राज्यात गोवरच्या आजाराचा वाढता प्रादुर्भाव असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सने लागण झालेल्यांना क्वारंटाईन करण्याचे निर्देश दिले आहेत. गोवरची लागण झालेल्या मुलांना किमान सात दिवसांसाठी विलगीकरणात ठेवावं, असे निर्देश टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत. यासाठी रुग्णालयीन व्यवस्था करण्याचे निर्देही टास्क फोर्सने दिले आहेत.
तसेच, कुपोषित बालकांना गोवर आजाराची लागण झाली असेल, तर त्यांची अधिक काळजी घेणे आवश्यकअसते. अन्यथा त्यांच्या जीवावर बेतू शकतें. त्यामुळे कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करून या बालकांना आवश्यक पोषण आणि जीवनसत्त्व ‘अ’चा डोस द्यावा, असे निर्देशही टास्क फोर्सने प्रशासनाला दिले आहेत.
No comments:
Post a Comment