गोवरमुळे मुंबईत दुसऱ्या बालकाचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 November 2022

गोवरमुळे मुंबईत दुसऱ्या बालकाचा मृत्यू


मुंबई - मुंबईत गेल्या २ महिन्यात गोवर आजाराचा प्रसार वाढला आहे. मागील महिन्यात गोवरमुळे एका मुलाचा मृत्यू झाला होता त्यानंतर आता नळ बाजार येथील १ वर्षाच्या मुलाचा मृत्यू काल सोमवारी कस्तुरबा रुग्णालयात झाला आहे. हा मुलगा दोन दिवस ताप आणि फुफ्फुसाचा आजार झाल्याने व्हेंटिलेटरवर होता. गोवरमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. 
 
बालकाचा मृत्यू - 
मोहम्मद हसन या बाळाला ताप होता तसेच त्याला फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग झाल्याने त्याला शुक्रवारी मुंबई पालिकेच्या चिंचपोकळी सातरस्ता येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारी दुपारी त्याला लाइफ सपोर्टवर (व्हेंटिलेटरवर) ठेवण्यात आले. सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुलाचा मृत्यू झाला. गोवर ब्रॉन्कोप्न्यूमोनियासह तीव्र मूत्रपिंड निकामी तसेच सेप्टिसीमिया (Cause of death -septicemia with acute renal failure with measles bronchopneumonia) मुळे या बाळाचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूने कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मृत बाळाची जुळी बहीण आहे. तिलाही गोवर झाला होता, ती सौम्य लक्षणांसह बरी झाली. “त्यांना नऊ महिन्यांत एकत्र लसीकरण करण्यात आले होते. त्यांना १६ महिन्यांनी दिली जाणारी दुसरी लस दिली जाणार होती त्याआधीच या बालकाचा मृत्यू झाला आहे. 

६१ रुग्ण रुग्णालयात, ६ ऑक्सीजनवर -
जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे १०९ रुग्ण आढळून आले आहेत. तर ताप आणि पुरळ आलेले ९०८ संशयित रुग्ण आहेत. ६१ रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ६ मुले ऑक्सीजनवर आहेत. ० ते ८ महिन्याचे ९९, ९ ते ११ महिने १०५, १ ते ४ वर्ष ४९३, ५ ते ९ वर्षे १६२, १० ते १४ वर्षे ४४, १५ आणि त्यावरील ६ असे एकूण ९०८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी कस्तुरबा रुग्णालयात ६१ रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. त्यात ० ते ८ महिन्याचे ८, ९ ते ११ महिने ५, १ ते ४ वर्ष ३१, ५ ते ९ वर्षे १४, १५ आणि त्यावरील ३ रुग्ण आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad