मुंबई - मागील काही दिवसांपासून गोवरची साथ झपाट्याने वाढते आहे. आतापर्यंत सात मृत्यू झाले आहेत. हे सर्व संशयित मृत्यू असल्याची नोंद झाली असली तरी यातील दोन मृत्यू गोवरने झाल्याचे निश्चित झाले आहे. ६१ रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील पाच रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी एका रुग्णाला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान येत्या दोन- तीन दिवसांत अहवाल आल्यानंतर हे सर्व सातही रुग्ण गोवरने मृत्यू झाले आहेत का हे स्पष्ट होईल, अशी माहिती मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
मुंबईत गेल्या काही दिवसात गोवर रुग्णांची संख्या वाढते आहे. मुंबईत ८ विभागातील झोपडपट्ट्यात गोवरचे आतापर्यंत १४२ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण गोवंडीतील आहेत. लक्षणे दिसणा-या ६१ रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील पाच रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी एका रुग्णाला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर आतापर्यंत सात संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने गोवंडी शताब्दी रुग्णालयात १० बेड्स वाढवण्यात आले आहेत. शिवाय गोवंडीतील मॅटर्निटी होममध्येही रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत सात जणांचा संशयित मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. डेथ ऑडिट कमिटीचा रिपोर्ट येत्या दोन - तीन दिवसांत आल्यानंतर हे मृत्यू नेमके कशामुळे झाले हे स्पष्ट होईल, असे गोमारे यांनी सांगितले.
मुंबईत सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यापासुन गोवर आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आले असून सर्वाधिक रुग्ण गोवंडीतील आहेत. एम पूर्व गोवंडी विभागात एकूण १ लाख १४ हजार १५७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिरिक्त लसीकरण सत्रामध्ये १२६१ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर मुंबईत १० लाख ९२ हजार ३९१ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
मुंबईत आतापर्यंत एकूण १४२ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एकट्या गोवंडीत ४४ रुग्ण आहेत. मुंबईत अतिरिक्त सत्रात ५९७२ मुलांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या विभागात केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या तीन सदस्य असलेली टीम विभागवार भेट देत आहे.
घरोघरी सर्वेक्षण व अतिरिक्त कॅम्प -
मुंबईत गोवरचा वाढता धोका लक्षात घेऊन पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विभागवार घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण केले जात असून लक्षणे आढळणा-या मुलांना रुग्णालयात दाखल केले जाते आहे. त्यासाठी अतिरिक्त आरोग्य कॅम्प आयोजित केले जात आहेत. लसीकरणावरही भर दिला जातो आहे. गोवरचे रुग्ण झोपडपट्टीतील असल्याने या भागात जनजागृती केली जाते आहे.
गोवंडी शताब्दी रुग्णालयात १० बेड्स व्यवस्था
गोवरचे सर्वाधिक रुग्ण गोवंडीत आढळले आहेत. येथील रुग्णांना कस्तुरबा रुग्णालय लांब पडत असल्याने तेथील शताब्दी रुग्णालयात १० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहेत. तसेच या परिसरातील मॅटर्निटी होममध्येही रुग्णांना दाखल केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
२० हजार मुलांच्या लसीकरणावर भर देणार -
मुंबईत ० ते २ वयोगटातील पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले आहे. यात २० हजार मुलांचे लसीकरण राहिले आहे. काहींनी एकच डोस घेतला आहे. तर काहींनी लसिकरणच केलेले नाही. त्यामुळे अशा २० हजार मुलांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले जाणार असून या सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.
मुंबईत गोवरचे हायरिस्क विभाग-
विभाग - रुग्ण
ई - ५ रुग्ण
एम पूर्व - ४४
एम - पश्चिम - ६
एल - २९
पी- नॉर्थ - १४
जी नॉर्थ - १२
एच - ई - ११
एफ - नॉर्थ - १२
No comments:
Post a Comment