मुंबई - भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे पेन्शन योजनेचा लाभ घेणा-या कर्मचा-यांची वेतन मर्यादा वाढवण्याचा विचार केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसे झाल्यास सध्याची 15 हजार रुपयांची वेतन मर्यादा वाढून ती 21 हजार होणार आहे. त्यामुळे पीएफ अंतर्गत कर्मचा-यांना मिळणारा लाभही वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
EPFO कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत वेतनमान 21 हजार उच्च वेतनश्रेणीशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पीएफ धारकांना दुहेरी फायदा होणार आहे. सध्या EPF योजनेंतर्गत सेवानिवृत्ती बचत योजनेची वेतन मर्यादा दरमहा 15 हजार रुपये इतकी आहे. ही मर्यादा वाढवल्यास जवळपास 75 लाख अधिक कर्मचारी हे EPFO च्या कक्षेत येणार आहेत. यासाठी सरकारकडून लवकरच तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे EPFO अंतर्गत 15 हजार रुपये वेतन मर्यादा असताना 12 टक्के दराने पीएफचे मासिक योगदान 1800 रुपये होते. पण हीच वेतन मर्यादा जर 21 हजार रुपये इतकी झाली तर 12 टक्के दराने पीएफचे योगदान 2 हजार 520 रुपये इतके होणार आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, पीएफ धारकांना निवृत्तीच्या वेळी सर्वाधिक लाभ होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment