मुंबई - अंधेरीतील गोखले पुलाचे बांधकाम तातडीने आणि युद्धपातळीवर व्हावे म्हणून सुरू झालेल्या ऑनलाईन याचिकेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे १० हजार नागरिकांनी ही ऑनलाईन याचिका स्वाक्षरी करून दिली आहे. या याचिकेची प्रत अंधेरी लोखंडवाला ओशिवरा सिटीझन असोसिएशनच्या प्रतिनिधींनी स्थानिक आमदार अमित साटम यांना सुपूर्द केली असल्याचे सांगण्य़ात आले.
अंधेरीतील गोखले पुलाचे काम रेल्वेने तातडीने हाती घ्यावे. या पुलाचे काम एल एण्ड टी किंवा भारतीय लष्करासारख्या मोठ्या यंत्रणेला द्यावे अशी मागणीही यानिमित्ताने करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वेच्या एका पीएसयूने तातडीने काम करत अवघ्या २० दिवसात ब्रीज बांधला होता. त्याच पद्धतीचा ब्रीज हा अंधेरीवासीयांसाठी बांधावा अशी मागणी अंधेरी लोखंडवाला सिटीझन असोसिएशनची आहे. आम्ही सुरू केलेल्या चेंज डॉट ओआरजीच्या याचिकेच्या निमित्ताने हे काम युद्धपातळीवर व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. याची प्रत स्थानिक आमदारांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनीही या गोखले ब्रीजच्या कामात लक्ष घालावे अशी मागणी आम्ही याचिकेच्या निमित्ताने केल्याचे असोशिएशनचे अध्यक्ष धवल शहा यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment