संजय गांधी उद्यान ते चैत्यभूमी संविधान बचाव यात्रा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2022

संजय गांधी उद्यान ते चैत्यभूमी संविधान बचाव यात्रा


मुंबई - संविधान बचाव अभियान अंतर्गत देशभरात 300 हुन अधिक सामाजीक संघटनांनी नफरत छोड़ो संविधान बचाव यात्रेचे आयोजन केले. 24 नोव्हेंबर रोजी बोरीवली राष्ट्रीय संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून या यात्रेला सुरुवात झाली. आज संविधान दिनी 26 नोव्हेंबरला दादर चैत्यभूमी येथे या यात्रेचा समारोप करण्यात आला. 

सुरक्षित घरांचा अधिकार यांसह रोजगार् अन्न सार्वजनिक अन्न सुरक्षा, शिक्षा निती, यांसह सर्वसामान्य जनतेच्या समस्या घेवून निघालेल्या या यात्रेत जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या सह फिरोज मिठीबोरवाला, गुड्डी तिवारी, पुनम कनोजिया, पूजा पंडीत, मंजू कांबळे यांसह शेकडो कार्यकर्ते  सहभागी झाले. 

याच यात्रेचा एक भाग म्हणून 25 नोव्हेंबर रोजी मानखुर्द मंडाळा येथून यात्रा सुरु झाली. हि यात्रा
संविधान दिवसाच्या निमित्ताने नागरी अधिकारांच्या संविधानिक सुरक्षेसाठी असल्याने सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन ही यात्रेत सहभाग घेतला. या यात्रेत मुंबई व मुंबई बाहेरील अनेक सामाजीक संस्थांनी सहभाग घेतला, मुंबईतील घर बचाओ घर बनाओ आंदोलन च्या वतीने मंडाळा, मानखुर्द ट्रांजिस्ट कैम्प, चिंता कॅम्प, बैंगनवाडी, माहुल वरून शेकडोंच्या संखेने सहभागी झाले. 

यात्रेला आज 26 नोव्हेंबरला दुपारी 12.00 वाजता धारावी येथून सुरवात झाली. पुढे  माहीम, मार्गे ही यात्रा चैत्यभूमी येथे पोहचली. दरम्यान भाऊ कोरडे यांनी आपल्या सहकारींसह माहीम मध्ये स्वागत केले. चैत्यभूमी येथील जनसभेत 26/11 हा दिवस मुंबई वरील दहशतवादी हल्ल्याची आठवण देखिल आहे. या हल्ल्यात शहिद झालेल्यांना श्रद्धांजली वाहून  सभेला सुरवात झाली.

नागरिकांच्या अधिकारांसाठी व लोकशाही साठी संविधान एकमेव आधार असून ते अबाधित  ठेवण्यासाठी समाजाने जाती, धर्म भाषा, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन एकत्रित आले पाहिजे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या यात्रेत समता, न्याय व सन्मानपूर्वक सुरक्षित जीवन हा प्रत्येक भारतीयांचा  अधिकार असून तो लहानातल्या लहान व्यक्ती पर्यंत पोहचलाच पाहिजे यासाठी समाजातील सर्व स्थरातील नागरिकांनी आग्रह करायला हवा असे मत तुषार गांधी यांनी मांडले. 

एकूनच देशातील परिस्तिथी पाहता जातीय वाद, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेऊन सर्व समाजाने बंधुत्वाची भावना जपावी व ती वाढीस लागावी या उद्देशाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले. तसेच शहरी विकास, त्यातील स्थानिकांचा सहभाग,  शिक्षण व्यवस्था, यासह रोजगार आणि अन्नसुरक्षा या बाबतीत नागरिकांना योग्य अधिकार मिळायला हवे आणि  या अधिकारांची भारतीय संविधनात तरतूद आहे. ते मिळायलाच हवे.  समाजातील द्वेष संपून, बंधुत्व व एकोप्याची भावना वाढीस लागावी यासाठी नागरीकांनी पुढाकार घ्यावा. आपल्या न्याय, हक्कांसाठी संविधान आधार आहे. याचे रक्षण आणि पालन व्हायलाच पाहिजे अशी भावना मेधाताई पाटकर यांनी व्यक्त केली. संविधान प्रस्तावनेचे वाचन, राष्ट्रगीत नंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून यात्रेची सांगता करण्यात आली.

या यात्रेत प्रा़. भालचंद्र मुणगेकर (मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरू), फिरोज मिठीबोरवाला (नफरत छोडो संविधान बचाओ अभियान), डॉल्फी डिसोजा  (मुंबई ख्रिश्चन सभा अध्यक्ष), फाहद अहमद (युवा नेता), पूनम कनोजिया (घर बचाओ घर बनाओ आंदोलन), स्टेनली फर्नाडीस, खातून शेख,(भारतीय मुस्लिम महिला आंदोलन), नंदू शिंदे, पूजा पंडित, अन्वरी बहन्, पिहू परदेशीं, मंजू कांबळे, रेखा गाडगे यांसह शेकडो, दलित, आदिवासी, बहुधर्मीय नागरीकांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad