मुंबई - पालिकेच्या विले पार्ले येथील कूपर रुग्णालयातील सफाई कामगारांचे वेतन कंत्राटदारांकडून दोन ते तीन महिने रखडवले जात आहे. प्रॉव्हिडंट फंडांची रक्कमही दिली जात नसून इतर सुविधाही मिळत नसल्याने कर्मचारी हैराण आहेत. याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटी कंपनीवर तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेने दिला आहे.
कूपर रुग्णालयात कल्पतरू कंपनीकडून सफाई कामगारांची सेवा पुरवली जाते. ‘कल्पतरू’ कंपनीचे कंत्राट २०१९ साली संपलेले आहे. कूपर प्रशासन या कंपनीला ३-३ महिन्यांचे कंत्राट बेकायदेशीरपणे वाढवून देत आहे, असा आरोपही कामगार सेनेने केला आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार कंत्राटी कामगारांना किमान वेतन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र हे वेतन दिले जात नाही. याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित कंत्राटदार कामगारांवर करीत असलेल्या अन्यायाची लेखी तक्रार युनियनने महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (आरोग्य), उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) तसेच महाराष्ट्र शासनाचे कामगार विभाग, उप-कामगार आयुक्त यांना दिली आहे. उप-कामगार आयुक्त यांना तक्रार मिळताच कूपर रुग्णालय कार्यालयातील कर्मचार्यांकडून व कल्पतरु हाऊसकिपिंग कंपनी कर्मचान्यांकडून संबंधित तक्रारीची माहिती घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व बेकायदेशीर बाबींची चौकशीही होत आहे.
तर प्रशासन जबाबदार -
राज्य कामगार विमा संरक्षण कामगारांना मिळत नाही, महिला कर्मचान्यांनी वरील बाबी विचारणा केल्यास दमबाजी करून कल्पतरुचे कर्मचारी दादागिरी करीत असतात. याच्या निषेधार्थ कर्मचार्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याला म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित कंपनीवर तातडीने कारवाई न केल्यास ठिय्या आंदोलन केले जाईल. आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्यास रुग्णालय प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व चिटणीस संजय वाघ यांनी दिला आहे.

No comments:
Post a Comment