राज्यातील महापालिकांसाठी नव्याने प्रभाग रचना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2022

राज्यातील महापालिकांसाठी नव्याने प्रभाग रचना


मुंबई - राज्यातील मुंबई महापालिकेसह २४ महापालिकांच्या निवडणुका विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये रखडलेल्या असताना महापालिकांची नव्याने प्रभाग रचना (New Wards Of Municipal Corporations) करण्याचे आदेश नगरविकास विभागाने काढल्याने महापालिका निवडणूका अजून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थानिक संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी होणार असतानाच शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडीने बदललेली प्रभाग रचना नव्याने बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईसह राज्यातील २४ महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने मंगळवारी काढले. मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या/रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरु करण्यात यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने संबंधित महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राज्य सरकारने महाविकास आघाडी सरकारने लोकसंख्या वाढीच्या आधारावर सरासरी प्रभाग/ वॉर्ड संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. यातच नवीन मुंबई, औरंगाबादच्या निवडणूक दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून, तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही फेब्रुवारीपासून प्रलंबित आहे. यातच अनेक ठिकाणी प्रशासक हे पालिकेचे कामकाज सांभाळत आहेत. पालिका निवडणूका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असतानाच नगरविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad