मुंबई - ठराव मंजूर होऊनही फ्लोरा फाऊंटन परिसरात उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारक परिसरातील बसथांबे आणि ‘बेस्ट’च्या (Best) गाड्यांवर ‘हुतात्मा स्मारक’ (Hutatma Smarak) असा पूर्ण उल्लेख करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन संपूर्ण उल्लेख करावा अशी मागणी संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाने केली आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ १९६१ मध्ये मुंबईत फ्लोरा फाऊंटन येथील हुतात्मा स्मारक परिसरात बसथांबे आणि ‘बेस्ट’च्या गाड्यांवर ‘हुतात्मा स्मारक’ असा पूर्ण उल्लेख प्रशासनाकडून अद्याप करण्यात आलेला नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्यात १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागातून १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्मांच्या स्मरणार्थ २१ नोव्हेंबर १९६१ मध्ये फ्लोरा फाऊंटन परिसरात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. मुंबई महानगरपालिकेने २९ एप्रिल १९६३ रोजी ‘हुतात्मा चौक’ नावाचा ठराव मंजूर केल्यानंतर हुतात्मा चौक हे नाव वापरात आले. मात्र यामध्ये ‘स्मारक’ शब्दाचा उल्लेख नव्हता. या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौक या नावात ‘स्मारक’ उल्लेख करावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृति मंडळाचे अध्यक्ष महादेव गोविंद तथा भाऊ सावंत यांनी ९ जानेवारी २०१५ रोजी मुंबईच्या महापौर, पालिका आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला. यानुसार मुंबई महानगरपालिकेने ८ मे २०१७ रोजी ‘हुतात्मा चौक’ या नावाऐवजी ‘हुतात्मा स्मारक चौक’ नावाचा सुधारित प्रस्ताव मंजूर झाला. मात्र या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. हा प्रस्ताव तब्बल ५४ महिन्यांपासून पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी प्रलंबित होता. मात्र पाठपुराव्यामुळे १८ डिसेंबर २०२१ यावेळी ‘हुतात्मा स्मारक चौक नावाचे सुधारित नामफलक लावण्यात आले. परंतु त्यानंतर ११ महिन्यांचा कालावधी उलटूनही ‘बेस्ट’ उपक्रमाच्या बस गाड्या व थांब्यांवर अजूनही ‘हुतात्मा स्मारक चौक’ अशा पूर्ण नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. याकडे संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाच्या पदाधिका-यांनी बेस्ट प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ‘बेस्ट’ महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांना याबाबतचे पत्र देऊन याची अंमलबजावणी करण्याबाबतची मागणी केली आहे.

No comments:
Post a Comment