मुंबई - भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनासाठी मुंबईकडे येण्यासाठी मध्य रेल्वेकडून १४ विशेष रेल्वे ट्रेन सोडण्यात येणार असल्याची ग्वाही मध्य रेल्वेच्या अधिका-यांनी दिली.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणदिनी सोडण्यात आलेल्या २३ विशेष रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर जनतेत तीव्र लाट पसरली आहे. या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र महासचिव सुनील थोरात मुंबई उपाध्यक्ष अविनाश समींदर यांच्यासह भीम आर्मीच्या पदाधिका-यांनी मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांची भेट घेऊन चर्चा केली. मुंबईकडे येणा-या नव्हे तर बाहेरगावाहून ईतर ठिकाणी जाणा-या ट्रेनच्या फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणदिनी मुंबईकडे येणा-या प्रवाशांसाठी १४ विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर नागपूरहून मुंबई कडे येणा-या गाड्यादेखील नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे लाहोटी यांनी शिष्टमंडळाला दिली.
दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून दिनांक तीन तारखेपासून सहा डिसेंबर पर्यंत मुंबईकडे येणाऱ्या गाड्या बंद असणार आहेत ही बातमी आल्यानंतर रेल्वे प्रशासनांना भेटून सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या सूचनेनुसार कामगार नेते रमेश जाधव, प्रतीक कांबळे, राम तुपेरे, प्रसन्नजीत कांबळे यांनी रेल्वे प्रशासनासोबत बैठका घेऊन रद्द केलेल्या गाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. यावर रेल्वे गाड्या सोडल्या जातील असे लेखी आश्वासन घेतले.
हे ही वाचा -
महापरिनिर्वाण दिनाला २२ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय !
No comments:
Post a Comment