मुंबई - मुंबई महापालिकेच्या विविध विविध विभागानुसार कोट्यवधीची कामे केली जातात. या कामांतील त्रूटीवर लक्ष ठेवून दक्षता विभागाकडून कारवाई केली जाते. यात निकृष्ट दर्जाची कामे, कामांतील हलगर्जीपणा, घोटाळा समोर आणून कारवाई केली जाते. यंदा १ एप्रिल २०२२ पासून ते आतापर्यंत वर्षभरात दक्षता विभागाने केलेल्या कारवाईनुसार सुमारे ८ कोटीचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई महापालिकेत रस्ते, पुल, इमारती बांधकाम, दुरुस्ती, खरेदी आदी विविध प्रकल्पांच्या होणा-या कामांच्या त्रूटीवर पालिकेच्या दक्षता विभागाचा वॉच असतो. दक्षता विभागांकडून झालेल्या कामांचा ऑनलाईन आढावा घेतला जातो. यात निकृष्ट दर्जाचे काम, खर्चात अनियमितपणा, हलगर्जीपणा, नियमबाह्य कामे आदीं कामांतील चुकांवर दक्षता विभागाकडून प्रकाशझोत टाकून घोटाळे उघडकीस आणले जातात. दक्षता विभागाकडून विभागवार कामाची ऑनलाईन तपासणी केली जाते. त्यात आढळणा-या त्रूटी संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या जातात. कामांत घोटाळे आढळल्यास दक्षता विभागाकडून कारवाई केली जाते. मागील १ एप्रिल २०२२ पासून आतापर्यंत जवळपास वर्षभरात विविध कामांतील त्रूटी दक्षता विभागाला आढळल्या. त्यानुसार दक्षता विभागाने संबंधित कंत्राटदारांवर सुमारे ८ कोटीचा दंड वसूल केला असल्याचे संबंधित विभागातून सांगण्यात आले. काही निकृष्ट दर्जाच्या व वेळकाढूपणा केलेल्या कामांसाठी संबंधित कंत्राटदारांना सुधारणा करण्यासाठी मुदत दिली जाते. या मुदतीत सुधारणा करण्यात आली आहे का याची खातरजमा करण्यासाठी दक्षता विभागाची टीम कामाच्या ठिकाणी जाऊन तपासणी करते. मुदत देऊनही सुधारणा न झाल्याचे आढळल्यास दक्षता विभागाकडून नियमानुसार कारवाई केली जाते. अनेक मोठ्या घोटाळ्यांच्या प्रकरणात पोलिस केस, न्यायालयीन कारवाई, काळ्या यादीत टाकणे अशी कारवाईही केली जात असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.
कामांतील घोटाळ्यांवर दक्षता विभागाचा वॉच -
रस्ते बांधणी, डांबरीकरण, पूल बांधणी, दुरुस्ती, विविध खरेदी, इमारत बांधकाम, कामांतील अनियमितपणा, हलगर्जीपणा, निकृष्ट दर्जाचे काम आदी कोट्यवधीची कामे मुंबई महापालिकेकडून केली जातात. या कामांची प्रक्रिया सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत दक्षता विभागाची नजर असते. त्रूटी आढळल्यास त्याची तपासणी करून संबंधित कंत्राटदार किंवा अधिका-यांवर दक्षता विभागाकडून कारवाई केली जाते.

No comments:
Post a Comment