मुंबई - कर्नाक पुलाच्या पाडकामाच्या घेण्यात आलेल्या ब्लॉक दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टने विशेष बसेस चालवल्या. या बससेवेमुळे प्रवाशांची सोय झाली शिवाय बेस्टचाही फायदा झाला. बेस्टने दोन दिवसात ४८ हजार ९०९ प्रवाशांची वाहतूक केली. यातून ३ लाख १७ हजार ६९ रुपयांचा महसूल बेस्टच्या तिजोरीत जमा झाला आहे.
सीएसएमटी ते मस्सिद दरम्यानचा ब्रिटीशकालीन कर्नाक पूलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेने शनिवारी रात्रीपासून रविवारी पूर्ण दिवसभर मेगाब्लॉक घेतला. या ब्लॉक दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टने ८५ अतिरिक्त बेस्टसेवा चालवल्या. त्यामुळे माफक दरात प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचता आले. शनिवारी रात्री साडे दहा ते रविवारी रात्री साडे दहा वाजेपर्यंत वडाळा, सीएसएमटी, भायखळा, कुलाबा, धारावी डेपो, प्रतीक्षा नगर आगार अशा विविध डेपोतून जादा बसेस चालवण्यात आल्या. या गाड्यांच्या ४७१ फेऱ्यांमधून ४८ हजार ९०९ प्रवाशांनी प्रवास केला. प्रवाशांची गर्दी वाढल्यानंतर इतर आगारातील गाड्या मागवण्यात आल्या. दर सहा ते आठ मिनिटांच्या फरकाने बस धावत असल्याने मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला. शिवाय बेस्टच्या उत्पन्नातही ३ लाख १७ हजार ६९ रुपयांची भर पडली. बसेस वेळेवर व पुरेसा सोडण्याच आल्याने प्रवाशांना खासगी वाहनांची प्रतिक्षा करावी लागली नाही. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन न करता माफक दरात प्रवास करता आला.
No comments:
Post a Comment