उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंदुत्व आम्हाला मान्य - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 October 2022

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंदुत्व आम्हाला मान्य - प्रकाश आंबेडकर


मुंबई / पुणे - आम्ही शिवसेना किंवा काँग्रेससोबत युती करण्यास तयार असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडून एकला चलो रे ची भूमिका स्वीकारू शकतात. कारण त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. शिवसेनेचे हिंदुत्व वैदिक नाही, चातुर्वर्ण्य मानणारे नाही, त्यामुळं ते आम्हाला मान्य असल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ठाकरे कुटुंब आणि आंबेडकर कुटुंब यांच्यात तीन पिढ्यांपासून संबंध आहेत. उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा मनुस्मृतीचा निषेध केला होता असे आंबेडकर म्हणाले. बाळासाहेबांपासून आतापर्यंत शिवसेनेने मनुस्मृतीचे समर्थन केले नसल्याचे आंबेडकर म्हणाले. आम्ही शिवसेना किंवा काँग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आला नसल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले. ब-याच वर्षांनी सर्वच राजकीय पक्षांना समझोत्याच्या राजकारणाची जाणीव झाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच डाव्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. पण खरा प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरेंनी हा पाठिंबा मागितला का? हा पाठिंबा न मागता इतर पक्षांनी दिला आहे. सध्या शिवसेना महाविकास आघाडीसोबत राहील का? याबाबत माझ्या मनात शंका असल्याचेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad