मुंबई - ऋतुजा लटके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबतचे अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच या मुद्द्यावर त्यांनी सडेतोड उत्तर देत त्यांनी सर्व शक्यता संपुष्टात आणल्या. प्रसारमाध्यमांशी बोलताना मी निवडणूक लढणार ती मशाल चिन्हावरच असे त्यांनी स्पष्ट केले आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही. तसेच मला कोणतीही ऑफरही नाही असेही त्यांनी सांगितले.
माझे पती रमेश लटके हे नेहमीच उद्धव साहेबांसोबत कायम राहिले आहेत. त्यामुळे आमची लटके कुटुंबीयांची जी निष्ठा आहे, ती उद्धव साहेबांसोबतच आहे, असेही लटके यांनी सांगितले. राजीनामा मंजूर व्हावा म्हणून सामान्य प्रशासनाकडे मागील तीन दिवसांपासून फेऱ्या मारत आहे. जीएडी विभागाने माझे महिन्याचे वेतन देण्यासाठी चलनही भरून घेतले आहे. तसेच पालिकेने माझा राजीनामा आजच मंजूर करावा, अशीही विनंती मी आयुक्तांकडे केली आहे. जीएडी विभागाने सर्व तयारी झालेली असतानाच फक्त राजीनाम्यावर सही बाकी आहे असे कारण दिले आहे. याआधीची राजीनाम्याची सूचना दिली होती. पण दुसऱ्यांदा दिलेले पत्र हे राजीनाम्याचे होते असेही लटके यांनी स्पष्ट केले आहे. या राजीनामा मंजुरीत काही तांत्रिक अडचणी आहेत, असे मला वाटत नाही. मी दिलेला राजीनामा हा तातडीने मंजूर व्हावा अशी विनंती मी पालिकेकडे केली असल्याचे त्या म्हणाल्या.
सरकारचा दबाव नाही -
लटके यांच्या राजीनामा अर्जाबाबतची प्रशासकीय प्रक्रिया सुरु आहे. त्यांनी ३ ऑक्टोबरला राजीनामा दिला आहे. या अर्जाला ३० दिवस पूर्ण झालेले नाही. आमच्यावर सरकारचा कोणताही दबाब नाही.
- इकबालसिंग चहल, पालिका आयुक्त
No comments:
Post a Comment