मुंबई - घाटकोपर येथील आचार्य अत्रे मैदानात छट पूजा आयोजनाची परवानगी मिळवण्याचा मार्ग दुर्गा परमेश्वरी मंडळासाठी खुला झाला आहे. कोर्टानं सुनावणीनंतर भाजपप्रणित मंडळाची परवानगी रद्द करत पोलीसांना याचिकाकर्त्यांची थांबवलेली परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या पालिकेतील माजी गटनेत्या व मुंबईच्या कार्याध्यक्षा राखी जाधव यांच्या छट पूजा आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
घाटकोपर पूर्व पंतनगर आचार्य अत्रे मैदान गेले २० वर्षे छट पूजा होते. त्याला आम्ही मदत करतो. गेल्या वर्षी तेथे गर्दी वाढू लागली. हा कार्यक्रम स्थानिक नगरसेविका आणि राष्ट्रवादीच्या मुंबई कार्याध्यक्ष यांनी राखी जाधव हायजॅक केला. जुलै मध्ये राखी जाधव यांनी दुर्गा परमेश्वरी संस्थेकडून गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन आणि छटपूजेला पालिकेकडे परवानगी मागितली होती. २४ ऑगस्टला पालिकेने त्यांना तत्वतः मान्यता दिली. मान्यता देताना राखी जाधव यांच्या संस्थेला स्थानिक पोलीस ठाणे, ट्रॅफिक पोलीस आणि अग्निशमन दल यांच्या परवानग्या आणण्यास सांगितले होते. तसेच मैदानाचे भाडे भरण्यास सांगितले होते. याच उद्यानात राखी जाधव याणी गणेश विसर्जन, दहीहंडी तसेच नवरात्रीदरम्यान दुर्गा देवी मूर्ती विसर्जनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यानंतर छट पूजेसाठी परवानगी मागण्यासाठी राखी जाधव पालिकेच्या कार्यालयात गेल्या असता त्यांना नवरात्रीनंतर येण्याचे सांगण्यात आले. नवरात्रीनंतर राखी जाधव यांना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी परवानगीसाठी अर्जाचा मसुदा दिला असता त्यांना अग्निशमन दल आणि ट्रॅफिक पोलिसांनी परवानगी दिली. स्थानिक पंतनगर पोलीस ठाण्याने याच मैदानात दुसऱ्या संस्थेला परवानगी दिल्याचे सांगितले. याची माहिती मिळताच राखी जाधव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. राखी जाधव कोर्टात गेल्याचे समजताच पालिकेने त्यांना परवानगी नाकारल्याचे कळविले. दरम्यान भाजपा प्रणित अटल सामाजिक सांस्कृतिक संस्थेला पालिकेने छट पूजेची परवानगी दिली आहे. या संस्थेने सर्व परवानग्या मिळवल्या असून ७४ हजार ६० रुपये मैदानाचे भाडे भरले आहे. या संस्थेला दिलेली परवानगी रद्द करून आपल्याच संस्थेला परवानगी द्यावी अशी मागणी राखी जाधव यांनी कोर्टाकडे केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. यावेळी पालिकेनं यावर आपली भूमिका मांडताना स्पष्ट केलं की, याचिकाकर्त्यांना परवानगी देताना ज्या अटीशर्ती घातल्या होत्या त्यांची पूर्तात झाली नाही, म्हणून दिलेली परवानगी रद्द करण्यात आली. तसेच अटल सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान यांनी आवश्यक त्या सर्व परवानग्या सादर केल्या होत्या. म्हणून त्या संस्थेला परवानगी देण्यात आल्याचं महापालिकेकडून कोर्टात सांगण्यात आलं. मात्र ही परवानगी देण्यात मनपातर्फे नियमांचं उल्लंघन करत परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप दुर्गा परमेश्वरी संस्थेच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला. यावर न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठानं दोन्ही बाजू ऐकून घेत निकाल राखी जाधव यांच्याबाजूनं दिला. ही परवानगी नाकारताना पालिकेनं नियमांचं पालन केलेलं नाही, असं निरिक्षण हायकोर्टानं नोंदवलं आहे. दिलेली परवानगी नाकारताना मंडळाला तशी कल्पना देणारी नोटीस पाठवणं आवश्यक होतं, मात्र पालिकेनं तसं केलेलं नाही. मुंबई महापालिकेतर्फे इथं नियमांचं पालन करण्यात दिरंगाई झाल्याचं स्पष्ट दिसत असल्याचंही हायकोर्टानं आपल्या निकालात म्हटलेलं आहे.
No comments:
Post a Comment