मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या (Bmc, Mcgm) कीटक नियंत्रण विभागाने मुंबईत गेल्या दहा महिन्यांमध्ये मलेरिया आणि डेंग्यू नियंत्रणासाठी मोठी मोहीम राबवली. यात डेंगी आणि मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांची (mosquitos) उत्पत्ती ठिकाणांची तपासणी केली. पालिकेला या तपासणीत डेंगी पसरवणाऱ्या एडिस डासांची एकूण ७३ हजार ५५ उत्पत्ती स्थाने पालिकेला आढळली. या मोहिमेसह आता पालिकेने नागरिकांच्या सहभागासाठी पावले उचलली आहेत.
मलेरिया प्रसार करणाऱ्या एनोफिलीस डासांवर नियंत्रण करण्यासाठी पालिकेने विहिरी, पाण्याच्या टाक्या, तरण तलाव अशा ४ लाख ७ हजार ७९७ ठिकाणी भेटी दिल्या. एकूण उत्पत्ती स्थानांपैकी ९ हजार ७३४ ठिकाणी मलेरिला पसरवणारे एनोफिलीस डास आढळले. तर डेंगी नियंत्रणाच्या कारवाईत पालिकेने पाण्याची पिंपे, टायर, ऑड आर्टिकल, पेट्री लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट याठिकाणी तपासणी केली. त्याठिकाणी डेंगी पसरवणाऱ्या एडिस डासांची एकुण ७३ हजार ५५ उत्पत्ती स्थाने पालिकेला आढळली.
या कारवाईत पालिकेने छपरावरून तसेच विविध आवारातून १३ हजार ६९२ टायर्स काढले. तर ऑड आर्टिकल्स म्हणून ३ लाख ७४ हजार ५९६ आर्टिकल्स काढण्यात आले. पालिकेने सप्टेंबर अखेरीपर्यंत केलेल्या कारवाईत ११ हजार ४९२ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर ७८२ प्रकरणात पालिकेने दावे दाखल केले आहेत. तर १४ लाख ९ हजार ८०० रूपयांचा दंड या सगळ्या प्रकरणात आकारण्यात आला आहे. दरम्यान या मोहिमेबरोबरच आता नागरिकांच्या सहभागासाठी पालिकेने पावले उचलली आहेत.
No comments:
Post a Comment