मुंबईत १८, १९ ऑक्टोबरला १० टक्के पाणी कपात, पाणी जपून वापरा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2022

मुंबईत १८, १९ ऑक्टोबरला १० टक्के पाणी कपात, पाणी जपून वापरा


मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करताना पिसे पांजरापुर येथे शुध्दीकरण केले जाते. पिसे पांजरापुर येथील बंधाऱ्याच्या 'न्यूमॅटिक गेट'च्या परिरक्षणाचे काम चालू असल्यामुळे मुंबईतील काही परिसरांमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असून मंगळवार१८ ऑक्टोबर व बुधवारी १९ ऑक्टोबर रोजी मुंबई शहर व उपनगरात १० टक्के पाणी कपात (water cut in mumbai) करण्यात आली आहे अशी माहिती पालिकेच्या पालिकेच्या जल विभागाकडून देण्यात आली आहे. 

पिसे पांजरापुर येथील बंधाऱ्याच्या 'न्यूमॅटिक गेट'चे परिरक्षण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्यामुळे पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी ही साधारणत: ३१ मीटर राखणे आवश्यक असते. या वर्षी पावसाळा लांबल्यामुळे सदर काम लवकर हाती घेता आले नाही. पाणी पातळी वाढविण्यासाठी पिसे बंधाऱ्याच्या परिरक्षणाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. यानुसार परिरक्षण कार्य हाती घेण्यात येत असल्यामुळे १८ व १९ ऑक्टोबर रोजी मुंबई शहर व उपनगरात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. दरम्यान, या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad