१७ व १८ ऑक्टोबरला मुंबईत "या" विभागात पाणीपुरवठा बंद ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 October 2022

१७ व १८ ऑक्टोबरला मुंबईत "या" विभागात पाणीपुरवठा बंद !


मुंबई - मुंबई महापालिकेकडून मालाड पश्चिम मालवणी येथे जलवाहिन्यांच्या जोडणीचे व झडप बसवण्याचे काम केले जाणार आहे. हे काम १७ ऑक्टोबर रात्री १० ते १८ ऑक्टोबर रात्री १० या कालावधीत केले जाणार आहे. यामुळे मालाड पश्चिम विभागातील मढ, मालवणी, जनकल्याण नगर, मनोरी, गोराई तसेच कांदिवली पश्चिम या विभागातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल आणि न्यू म्हाडा परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद (Water cut in Malad Kandivali) राहणार आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मालाड (पश्चिम) विभागातील मालवणी प्रवेशद्वार क्रमांक १, राधाकृष्ण हॉटेल समोर मार्वे मार्ग येथे नव्याने ७५० मिलीमीटर व अस्तित्वात असलेल्या ६०० मिलीमीटर व्यासांच्या जलवाहिन्यांच्या जोडणीचे व ६०० मिलीमीटर मध्यवर्ती झडप बसविण्याचे काम सोमवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री १० वाजेपासून मंगळवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत म्हणजे सोमवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री १० वाजेपासून मंगळवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री १० वाजेपर्यंत मालाड (पश्चिम) विभागातील मढ, मालवणी, जनकल्याण नगर, मनोरी, गोराई तसेच कांदिवली (पश्चिम) या विभागातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल आणि न्यू म्हाडा परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. संबंधीत परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad