मुंबई - शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्य बाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. त्यानंतर आज उद्धव ठाकरे गटाला "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" हे नाव मिळाले असून ‘मशाल’ हे चिन्ह मिळाले आहे. तर एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले आहे. दरम्यान शिंदे यांच्या गटाने दिलेली त्रिशूळ, गदा ही चिन्हे बाद केली आहेत. शिंदे गटाला नवी चिन्हे देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
"मशाल" चिन्ह घराघरात पोहचावा - किशोरी पेडणेकर
पक्षाला "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" हे नाव मिळाले आहे. खरी लढाई पहिली जिंकली. आता शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाल हे चिन्ह घराघरात पोहचवा. ज्यांनी पक्षात काळ रात्र करण्याचे ठरवली तो उशकाल सूरु झाला आहे. पेटवा आयुष्याच्या मशाली असे आवाहन मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
आमच्यासाठी आनंदाची गोष्ट - शितल म्हात्रे
तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने "बाळासाहेबांची शिवसेना" म्हणून नाव दिले आहे. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. गेले तीन महिने आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत म्हणून बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाले आहे. अंधेरी येथील पोटनिवडणुकीसाठी हे नाव आणि चिन्ह आहे. शिवसेनेचे नाव आणि धनुष्य बाण हे चिन्ह याबाबत आमची लढाई सुरूच राहील अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्ता शितल म्हात्रे यांनी दिले आहे.
No comments:
Post a Comment