मुंबई - मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या जागी संजय मांजरेकर यांची नियुक्ती झाली आहे. सोमवारी प्रमुख अग्निशमन अधिकारी पदाचा कार्यभार हेमंत परब यांनी संजय मांजरेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
गेली ३३ वर्षे हेमंत परब हे अग्निशमन दलाच्या सेवेत कार्यरत होते. सहाय्यक अग्निशमन अधिकारी ते प्रमुख अग्निशमन अधिकारी पर्यंतची धुरा परब यांनी सांभाळली. त्यांनी १७ महिने प्रमुख अग्निशमन अधिकारी पद भूषविले. प्रमुख अग्निशमन अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारणारे संजय मांजरेकर हे देखील गेली ३३ वर्षे मुंबई अग्निशमन दलाच्या सेवेत कार्यरत आहेत.
No comments:
Post a Comment