मुंबई - मुंबईमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्याबाबतचा वाद न्यायालयात गेला होता. वरळी येथील जांभोरी मैदानात भाजपाला दहीहंडी करण्यास परवानगी दिल्याने शिवसेनेने उघड नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर आता छट पूजेचा वाद उच्च न्यायालयात गेला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या संस्थेला घाटकोपर येथील आचार्य अत्रे मैदानावर छट पूजा करण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई कार्याध्यक्षा व मुंबई महापालिकेतील माजी गटनेत्या राखी जाधव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यामुळे धार्मिक कार्यक्रमांवरून पुन्हा एकदा राजकारण तापणार असल्याचे समोर आले आहे.
राखी जाधव यांच्या संस्थेला परवानगी नाकारली -
घाटकोपर पूर्व पंतनगर आचार्य अत्रे मैदान गेले २० वर्षे छट पूजा होते. त्याला आम्ही मदत करतो. गेल्या वर्षी तेथे गर्दी वाढू लागली. हा कार्यक्रम स्थानिक नगरसेविका आणि राष्ट्रवादीच्या मुंबई कार्याध्यक्ष यांनी राखी जाधव हायजॅक केला. जुलै मध्ये राखी जाधव यांनी दुर्गा परमेश्वरी संस्थेकडून गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन आणि छटपूजेला पालिकेकडे परवानगी मागितली होती. २४ ऑगस्टला पालिकेने त्यांना तत्वतः मान्यता दिली. मान्यता देताना राखी जाधव यांच्या संस्थेला स्थानिक पोलीस ठाणे, ट्रॅफिक पोलीस आणि अग्निशमन दल यांच्या परवानग्या आणण्यास सांगितले होते. तसेच मैदानाचे भाडे भरण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी भाडे भरले नाही, इतर परवानग्याही आणलेल्या नाहीत. त्यामुळे उपायुक्त परिमंडळ ६ यांनी परवानगी रद्द केली. तसे पत्र उपायुक्तांनी १८ ऑक्टोबरला राखी जाधव यांना पाठविले आहे.
अटल सामाजिक सांस्कृतिक संस्थेला परवानगी -
मुंबई महापालिकेने दुर्गा परमेश्वरी संस्थेला दिलेली परवानगी रद्द केली आहे. त्याविरोधात त्यांनी पालिकेच्या घाटकोपर येथील पालिका कार्यालयावर मोर्चा काढला. पालिकेचे कार्यालय नसून हे भाजपचे कार्यालय असल्याचा आरोप केला.आचार्य अत्रे उद्यानात अटल सामाजिक सांस्कृतिक संस्थेला छट पूजेची परवानगी देण्यात आली आहे. संस्थेने सर्व परवानग्या आणल्या असून ७४ हजार ६० रुपये मैदानाचे भाडे भरले आहे. त्याविरोधात राखी जाधव यांनी कोर्टात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने अटल सामाजिक सांस्कृतिक संस्थेला दिलेली परवानगी कायम ठेवली आहे. राखी जाधव यांना याच मैदानात अर्ध्या भागात किंवा बाजूला असलेल्या अरुण कुमार वैद्य मैदानात कार्यक्रम करा असा सल्ला देण्यात आला आहे. येत्या २५ तारखेला त्यांना सुट्टीकालीन न्यायालयापुढे आपले म्हणणे मांडण्याचा सल्ला कोर्टाने दिला असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली. आचार्य अत्रे मैदानातील ३० टक्के भाग छट पूजेसाठी लागतो. इतर भाग पालिकेने त्यांना दिला तर आमची काही हरकत नाही असे शिरसाट म्हणाले.
पालिका कार्यालय भाजपाचे कार्यालय -
मी पालिकेला सर्वात आधी अर्ज केला होता. त्यासाठी पालिकेकडे परवानगीसाठी गेले असता मला नवरात्र उत्सवात आम्ही व्यस्त आहोत असे सांगण्यात आले. १४ ऑक्टोबरला मला परवानगीबाबतचा मसुदा देण्यात आला. स्थानिक पोलीस ठाणे, अग्निशमन दल आणि ट्रॅफिक विभागाकडे मी परवानगी मागितली. अग्निशमन दल आणि ट्रॅफिक विभागाने मला परवानगी दिली. मात्र पंतनगर पोलिसांनी याच उद्यानात दुसऱ्यांना परवानगी देण्यात आल्याचे सांगितले. यामुळे १९ ऑक्टोबरला मी उच्च न्यालयात याचिका दाखल केल्यावर दुपारी मला परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. पालिका कार्यालय भाजपाचे कार्यालय असल्याप्रमाणे काम करत आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच पालिकेतील माजी गटनेत्या राखी जाधव यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment