किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाचा दणका, याचिका फेटाळली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 October 2022

किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाचा दणका, याचिका फेटाळली


मुंबई - खार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा याकरिता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ही याचिका राजकीय हेतून प्रेरित असल्याचे निरीक्षण नोंदवत फेटाळून लावली आहे. हा सोमय्या यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. 

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना हनुमान चालीसा प्रकरणानंतर कार पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलीस स्टेशनला जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनिकांकडून त्यांच्यावर करण्यात आलेले आल्यानंतर पोलिसांनी सोमय्या यांच्या विरोधात एफआयआर दाखल केले होते. सोमय्या यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर खोटी आहे. याविरोधात तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात पोहोचले. त्या एफआयआरवर मी सही केलेली नाही. त्या एफआयआरवरील सही बनावट असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. राज्य सरकारने बनावट एफआयआर दाखल केली असून, सरकारची बनवाबनवी पकडली गेली आहे, असेही सोमय्या म्हणाले होते.

अतिरिक्त सरकारी अभियोक्त्या संगीता शिंदे यांनी न्यायालयास सांगितले की, खार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमय्या यांचे पुरवणी जबाब नोंदवण्यास तयार होते. सोमय्या यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, या सर्व प्रक्रियेमध्ये ते इतर सवलतींसाठी न्यायालय आणि यंत्रणांवर दबाव आणणार नाहीत. त्यामुळे ही याचिका निकाली काढण्यात यावी, अशी मागणी केली होती.

वकिलांनी आवाज उठवणे आम्हाला आवडत नाही. आम्ही घाबरणार नाही कोर्ट रूममध्ये कोणी आवाज चढून बोलणारे आम्हाला आवडत नाही. जर तुमच्याकडे चांगली केस असेल तर तुम्हाला आवाज उठवण्याची गरज नाही. काहीवेळा तुम्ही कोणासाठी हजर आहात यावर अवलंबून तुमचा आवाज वाढतो, अशा बाबत न्यायालयाकडून वकिलावर शुल्क आकारले जाते. याकरिता न्यायालयात शिस्त पाळली पाहिजे हे ध्यानात घ्या, अशा परखड भाषेत खंडपीठाने सोमय्या यांच्या वकिलांना खडसावले आहे. झालेल्या गैरसमजाबद्दल वकिलाने न्यायालयाकडे त्वरित माफी मागितली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad