मुंबई - आगीसारख्या दुर्घटनांमध्ये बचावकार्य करण्यासाठी मुंबईतील ८० व्या मजल्यापर्यंतच्या इमारतीत पोहचण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन बनवले जाणार आहेत. यासाठी पाच स्टार्टअप कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. ‘आयआयटी’ने सुचवलेल्या तंत्रज्ञानानुसार हा ड्रोन बनवण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त उंचीवर जाऊन दुर्घटनेची ठिकाणची छायाचित्रे पाठवणे, पाण्याचा फवारा मारून आग विझवणे अशी कामे अपेक्षित असणार आहे.
मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत असून उत्तुंग इमारतीत पोहचण्यासाठी अग्निशमन दलाला समस्या येतात. त्यामुळे अग्निशमन दलाची क्षमता वाढवून अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येत आहे. मुंबईत झपाट्याने औद्योगिक आणि नागरी विकास होत असून सध्या २५० ते ३०० मीटर उंचीच्या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे अग्निशमन दलासमोरील आव्हाने वाढत आहेत. उत्तुंग इमारतीमध्ये आग विझवणारी स्वयंचलित यंत्रणा ठप्प असल्यास जीवित आणि वित्तहानी वाढण्याचा धोका असतो. पालिकेकडे सध्या ९० मीटरपर्यंत उंच म्हणजे ३० व्या मजल्यापर्यंत जाणारी शिडी आहे. मात्र त्यावरील आगी विझवताना पाणी पोहोचवण्यात समस्या येतात. त्यामुळे वेळेत आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होते. त्यामुळे पालिकेने आगीसारख्या दुर्घटनांमध्ये बचावकार्यासाठी ड्रोन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
असा होणार फायदा -
आग लागलेल्या ठिकाणी जवान पोहोचू न शकणार्या ठिकाणी ड्रोन पोहोचून फोटो पाठवला जाईल. तसेच समुद्रात बचावकार्य करण्यासाठीही या ड्रोनचा वापर करता येणार आहे.

No comments:
Post a Comment