मुंबई - कोरोना झालेल्यांना टीबीचा धोका अधिक असल्याने ज्यांना तीव्र खोकल्याचा त्रास असेल अशांचे पालिकेकडून स्क्रिनिंग सुरु करण्यात आले आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयात ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. संबंधित रुग्णांनी पालिकेच्या जवळच्या रुग्णालयात तपासणी करून घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागातून करण्यात आले आहे.
मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोना झपाट्याने पसरला. मात्र योग्य उपचार पद्धती, नियमांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे आतापर्यंच कोरोनाच्या तीन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. सध्या रोज दीडशेच्या आत कोरोना रुग्णांची नोंद होते आहे. आता साडे अकरा लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना झाल्यानंतर खोकल्याचा त्रास असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. अशांना टीबीचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा रुग्णांची पालिकेने सर्व रुग्णालयात स्क्रिनिंग सुरु केली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे कोविडची आकडेवारी व रुग्ण दाखल झाल्याची माहिती उपलब्ध असल्याने रुग्णांचे स्क्रिनिंग करून त्याचा अहवाल करणेही सोपे जाणार आहे. पालिकेच्या सर्व वॉर्डातील रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध असून स्क्रिनिंग सुरुही झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. ज्यांना खोकल्याचा त्रास असेल अशा रुग्णांनी पालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहनही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment