मुंबई - अंधेरी येथील एका मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. कोर्टाने हे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी १ लाख रुपयांची लाच पालिका अभियांत्याकडून मागण्यात आली. ही रक्कम स्वीकारताना पालिका अभियंत्याला (Bmc) मे महिन्यात लाच लुचपत विभागाकडून (Anti corruption bureau Filed a case) रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी ५ महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरी पश्चिम येथे तक्रारदाराची जमीन आहे. या जमिनीवर इतर कोणीतरी पत्रे लावून अतिक्रमण करून जागा बळकावण्याचा प्रयत्न केला गेला. तक्रारदाराने ११ जानेवारी २०२२ ला पालिकेच्या अंधेरी पश्चिम येथील के पश्चिम कार्यालयात तक्रार दिली होती. त्यावर पालिकेने कोणतीही कारवाई केली नव्हती. यासाठी तक्रारदार कोर्टात गेला. कोर्टाने अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आहेत.
जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचे कोर्टाचे आदेश घेवून तक्रारदार पालिकेच्या अंधेरी पश्चिम येथील कार्यालयात गेला असता दुय्यम अभियंता दिपक शर्मा याने २ लाख रुपयांची लाच म्हणून मागितली. तक्रारदाराने ९ मे रोजी याबाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. १० मे रोजी १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार १८ ऑक्टोबर रोजी (३९/२०२२) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment