मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱया पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मंगळवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२२ ते गुरुवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबईमधील व बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱया पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
सदर दुरुस्ती कामाच्या कारणास्तव मंगळवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२२ ते गुरुवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मुंबई महानगरात व बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱया पाणीपुरवठ्यात देखील १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. (Water Cut in Mumbai)
No comments:
Post a Comment