मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गट, भाजपचा मनसेशी छुपा समझोता ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2022

मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गट, भाजपचा मनसेशी छुपा समझोता ?



मुंबई - राज्याच्या सत्तांतरानंतर मुंबई महापालिकेतील चित्र बदलले असून येत्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनिती मांडण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेत शिंदे गट व भाजपची युती होणार असताना मनसेलाही सोबत घेणार का अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र मनसेने स्वबळावर लढण्याचे जाहिर केले आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांवर उमेदवार उभे करण्याचे मनसेने ठरवले आहे. मात्र मनसेचा स्बळाचा नारा असला तरी निवडणुकीत शिंदे गट व भाजपचा मनसेशी छुपा समझोता केला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. मनसेशी जवळीक करून शिवसेनेची मराठी मते फोडण्यासाठी भाजप व शिंदे गटाचा प्रयत्न होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

शिवसेनेतून ४० आमदार फोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. या सत्तांतरानंतर राजकीय घमासान सुरु आहे. सत्ता संघर्षाचा वाद सद्या न्यायालयात आहे. येत्या काही महिन्यांत मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे. मागील २५ वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. शिवसेनेतील ४० आमदार फुटल्याने शिवसेनेची राज्यात असलेली सत्ता गेली आहे. भाजपसोबत शिंदे गटाने युती करून सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे शिवसेनेची सध्या अस्तित्वाची लढाई सुरु आहे. महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपची रणनिती सुरु आहे. शिवसेनेची मराठी मते फोडण्यासाठी मनसेशी भाजपची जवळीक निर्माण केली जात असल्याची चर्चा आहेत. मध्यंतरी भाजप व शिंदे गटातील नेत्यांच्या गाठी भेटी वाढल्याने मनसेशी युती होणार अशी चर्चा रंगली होती. शिवसेनेची मराठी मते फोडण्यासाठी भाजपची रणनिती असेल. मात्र मनसेने कोणत्याही पक्षासोबत युती केली जाणार नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत सर्व २२७ जागांवर उमेदवार उभे केले जाणार असल्याचे जाहिर केले. त्यामुळे युतीच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला असला तरी शिंदे गट व भाजपचा मनसेशी छुपा समझोता होईल. शिवसेनेची मराठी मते फोडण्यासाठी शिंदे गट - भाजपचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे मनसे सोबत नाही आली तरी काही जागांवर समझोता केला जाईल. काही महत्वाच्या ठिकाणी मनसेचा उमेदवार उभा असेल तिथे भाजप किंवा शिंदे गट उमेदवार देणार नाही, असा छुपा पाठिंबा देण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी मनसेला सोबत घेतले जाऊ शकते.

२०१२ साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेला तब्बल २९ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत ७ जागा निवडून आल्या. त्यातील सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्याने मनसेचा पालिकेत अवघा एक नगरसेवक राहिला. मात्र मागील निवडणुकीत मनसेला ब-याच जागांवर दुस-या क्रमांकावर पराभव स्वीकारावा लागला होता. सध्या शिवसेनेची वाताहात झाल्याने मनसेला स्पेस निर्माण झाली आहे. मागील काही महिन्यांपासून मनसे आपली ताकद वाढवण्यासाठी कामाला लागली आहे. कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे. त्यामुळे कोणासोबत युती न करता निवडणूक लढायची असा निश्चय मनसेने केला आहे. सध्या शिंदे गट, भाजपसोबत मनसेची जवळीक निर्माण झाली असली तरी स्वबळावर निवडणूक लढून ताकद दाखवणे असा निर्धार मनसेचा असल्याचे समजते. मात्र असे असले तरी शिवसेनेची मराठी मते फोडण्यासाठी शिंदेगट, भाजप मनसेशी छुपा समझोता करण्याची शक्यता जास्त असल्याची चर्चा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad