मुंबई - मुंबईचं नव्हे तर देशभरात कोणालाही उपचार करायचे असल्यास महापालिकेच्या रुग्णालयाला प्राधान्य दिले जाते. पालिका रुग्णालयातील उपचार आणि रुग्णांना दिली जाणारी सेवा यामुळे पालिका रुग्णालयात लाखो लोकांची गर्दीही असते आहे. याचाच प्रत्यय पालिकेच्या व्ही एन देसाई रुग्णालयात दिसून आला आहे. एका महिलेची यशस्वी शस्त्रक्रिया करून पोटातून फुटबॉलच्या आकाराचा ५ किलो वजनाचा गोळा काढला आहे.
एका ४२ वर्षीय महिलेला ६ महिने पोटदुखीचा त्रास होता. दुखणे असह्य झाल्याने त्या महिलेला पालिकेच्या व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यावर महिलेची तपासणी करण्यात आली. तिच्या ओटीपोटात वेदना, सूज आणि जडपणा जाणवत होता. स्त्रीची मासिक पाळी सामान्य होती. यामुळे आणखी चाचण्या केल्या असत्या तपासणीत महिलेच्या पोटात मोठी गाठ आढळून आली. पोटात मोठी गाठ असल्याने वाढत्या वेदनांमुळे तिची दैनंदिन कामे कमी होऊ लागली.
यशस्वी शस्त्रक्रिया -
महिलेची ढासळलेली तब्येत पाहून गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून पाच किलो वजनाची गाठ काढण्यात आली. शस्त्रक्रिया शक्य तितक्या लहान चीरांसह केली गेली. ऑपरेशननंतर एका आठवड्यात त्या महिलेला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती व्ही एन देसाई रुग्णालयातील वरिष्ठ सल्लागार व प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. कोमल चव्हाण यांनी दिली.
No comments:
Post a Comment