मुंबई - ठाणे रेल्वे स्थानकात शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असे सांगण्यात आले. यामुळे लाखो प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला. मात्र एका मोटरमनच्या चुकीमुळे ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. यामुळे या मोटरमनवर काय कारवाई होणार याकडे आता लाखो प्रवशांचे लक्ष लागले आहे.
ऐन गर्दीच्या वेळी ठाणे रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. या बिघाडामुळे डाऊन जलद, डाऊन धीम्या आणि अप धीम्या मार्गावर परिणाम झाल्याने या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. वाहतूक विस्कळीत झाल्याने मध्य रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तु़डुंब गर्दी झाली. जवळपास तासभर वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. रेल्वेच्या कर्मचा-यांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन बिघाड दूर केला. त्यानंतर तासाभरानंतर लोकल सुरु झाल्या. मात्र बराचवेळ रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेलेच होते. पाऊण तास रेल्वे उशिराने धावत होत्या. लोकलला गर्दी त्यामुळे कामावरुन घरी परतणा-या प्रवाशांचे हाल झाले.
मोटरमनच्या चुकीमुळे प्रवाशांना ताप -
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कल्याण सेमी फास्ट लोकल च्या मोटरमन ने ठाणे येथे सिग्नल तोडल्या मुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ठाणे पासून सगळ्या ट्रेनच्या रांगा लागल्या होत्या जवळ जवळ एक तास संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली होती. याची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून याप्रकरणी चौकशी करून मोटरमनवर कारवाई केली जाईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment