मुंबई - मुंबईत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात पार पडला आहे. त्यानंतर आता नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी हे सण महिनाभरात येत आहेत. दिवाळी जवळ आली की कामगार संघटनांना बोनस म्हणजेच सानुग्रह अनुदानाचे वेध लागतात. पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी २० टक्के बोनस द्यावा अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनचे नेते शशांक राव व रमाकांत बने यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कायम कामगार, कर्मचारी, अधिकारी, निरिक्षकीय कर्मचारी, सुरक्षा दल कर्मचारी, आरोग्य खात्यातील आरोग्य सेविका, कंत्राटी कामगार, बहुउद्देशीय कामगार, आरसीएच - २ मधील कर्मचारी, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कर्मचारी तसेच बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांना सन २०२१-२२ या आर्थिक वर्षा एकूण वित्तलब्धीच्या २० टक्के रक्कम बोनस / सानुग्रह अनुदान म्हणून दिवाळी २०२२ पूर्वी देण्यात यावी. अशी मागणी दि म्युनिसिपल कामगार युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
लवकर बैठकीचे आयोजन करा -
महापालिकेने कामगार, कर्मचारी, अधिका-यांना वर्षानुवर्षे सातत्याने विनाखंड बोनस / सानुग्रह अनुदान दिले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, २० टक्के बोनासची मागणी मंजूर करावी. बोनसच्या मागणीवर चर्चा करून निर्णय घेण्याच्या अनुषंगाने लवकरात लवकर बैठकीचे आयोजन करावे असे पत्रात नमुद केल्याचे बने यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment