श्रीगणेशाचरणी हारफुलांऐवजी "एक वही, एक पेन" अर्पण करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 August 2022

श्रीगणेशाचरणी हारफुलांऐवजी "एक वही, एक पेन" अर्पण करा



मुंबई-२६- विद्येची देवता व बुध्दिवान असलेल्या श्री गणेशाचे आगमन होत असून समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी गणेशोत्सवात हारफुले अगरबत्ती ऐवजी वह्यापेन तसेच शैक्षणिक वस्तू श्रीगणेशाचरणी अर्पण करून हा सोहळा साजरा करू या असे आवाहन एक वही एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सर्वात मोठा उत्सव असलेला गणेशोत्सव सुरू होत आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी चाकरमानी आपापल्या गावाकडे जात असतात.तर महाराष्ट्रात महीनाभरापासून या उत्सवाच्या पूर्वतयारीला मोठ्या प्रमाणावर सुरूवात केली जाते.यावेळी भव्य दिव्य देखावे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.गणेशोत्सवात गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर हारफुले उदबत्ती अगरबत्ती नारळ प्रसाद आदी श्रीगणेशा चरणी वाहून त्याची मनोभावे पूजा करीत असतात.यावेळी महाराष्ट्र भरातून श्रीगणेशा चरणी वाहण्यात आलेल्या हारफुलांची संख्या ही अगणित असते या वस्तूंचा पुन्हा उपयोग होत नाही. त्यामुळे बुद्धीची देवता असलेल्या श्रीगणेशाच्या चरणी नारळ, अगरबत्ती आणि प्रसाद वगळता हारफुलांऐवजी वह्या, पेन पेन्सिल, पुस्तक, दप्तर आदी शैक्षणिक वस्तू वाहण्यात आल्यास आपल्याला ख-या अर्थाने बुध्दीच्या देवतेची पूजा केल्याचे समाधान मिळेल. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या आगळ्या वेगळ्या मोहिमेची सुरूवात करून समाजासमोर एक नवा आदर्श घालून द्यावा असे आवाहन एक वही एक पेन अभियानचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार राजू झनके यांनी केले आहे.

महाराष्ट्रात दोन वर्षे कोरोना महामारीत गेली अनेक कुटुंबांनी आपल्या कुटुंब प्रमुखासह जवळचे नातेवाईक गमावले आहेत.लोकांचा गाडा आताशी रूळावर येत असताना महाराष्ट्रातील अनेक खाजगी शाळा आणि काॅलेज व्यवस्थापनांनी पालकांकडून फीची सक्तीची वसुली सुरू केली आहे.त्यामुळे पालकही हवालदिल झाले आहेत.यात समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील पालकांची अधिकच कुचंबणा होत असून अशा सर्वांना मदतीचा हात म्हणून घरगुती गणेशोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सवात जमा झालेल्या सर्व शैक्षणिक वस्तूंचे वितरण समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना केल्यास एक नवा पायंडा पाडण्यास चांगली सुरूवात होणार असून यात सर्वांनी आपापल्या परीने सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा एक वही एक पेन अभियानच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. या अभियानात सहभागासह अधिक माहिती साठी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad