मुंबई - दहिहंडी क्रीडा प्रकारात गोंिवदांसाठी शासकीय नोक-यांमध्ये ५ टक्के आरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी घोषणा देताच सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. एका महिलेने गोविंदांना आरक्षण देताय तर मंगळागौर आगोटा पागोटा करणा-या महिलांना पण सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत अर्धवेळ नोक-या द्या अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिहंडीचा आता क्रीडा प्रकारात समावेश करण्यात आल्याची घोषणा गुरुवारी विधानसभेत केली. तसेच, खेळात सहभागी खेळाडू अर्थात गोविंदांना शासकीय योजनांचा लाभही मिळणार आहे. यामध्ये गोविंदांसाठी शासकीय नोक-यांमध्ये ५ टक्के आरक्षण असेल अशी घोषणा केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या घोषणेविरोधात सोशल मीडियावर तीव्र नाराजी उमटताना दिसत आहे. अनेक युजर्सनी त्यांच्या शिक्षणावर प्रश्न तर पदासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर गोविंदाप्रमाणे मंगळागौर करणा-या महिलांना सुद्धा नोक-या द्या, सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment